मला तारीख आणि वेळ द्या , मी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार :- खासदार नवनीत राणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आज अमरावतीच्या हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं पठण केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही पारंपारिक वेशात मंदिरात आले होते. दोघांनीही मंदिरात जमिनीवर बसून हनुमान चालिसाचे पठण केले.
हनुमान जयंतीच्या (hanuman jayanti) पार्श्वभूमीवर त्यांनी हे पठण केलं. त्यापूर्वी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसाचं पठण करावं अन्यथा आम्ही मातोश्रीवर येऊन आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून सर्व शिवसैनिक मातोश्रीवर आले आहेत. मात्र, राणा दाम्पत्य अजूनही अमरावतीत असल्याने ते मातोश्रीबाहेर आंदोलन करणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..