मुंबईतून सूटले अन् साताऱ्यात फसले , सदावर्तेना पोलिसांनी गाडीत घेतले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मागील ४ महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यात काही संतप्त कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक घरावर हल्ला केला होता.
या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०९ जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी गिरगाव कोर्टाने गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, तत्पूर्वीच सातारा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सदावर्ते यांनी छत्रपती घराण्यासंदर्भात बदनामी करणारं वक्तव्य केलं होतं. तेढ निर्माण होईल, असं ते वक्तव्य असल्याने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. दीड वर्षापूर्वी केलेल्या विधानावरून सदावर्तेंवर साताऱ्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावर कोर्टाने सदावर्तेंना अटक करण्याची नोटीसही बजावली. त्यानुसार गिरगाव कोर्टात सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा देण्यासाठी अर्ज केला होता. त्याला कोर्टाने परवानगी देत १७ एप्रिलला पर्यंत ताबा घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार, सातारा पोलीस कालच मुंबईत दाखल झाले. त्यानंतर, गुणरत्न सदावर्तेंना ताब्यात घेऊन ते आज साताऱ्याला रवाना झाले आहेत. पोलिसांसमवेत मोठा फौजफाटा दिसून आला.
दरम्यान, गिरगाव कोर्टात सुनावणी होताना सरकारी वकिलांनी सदावर्ते यांना ७ दिवसांची आणखी कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी केली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..