जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 7 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 14 डिसेंबर :- यवतमाळ जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वि.प्र.पाटकर यांच्या मार्गदर्शनात दिनांक 7 मे 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहीक संबंधातील वाद प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे, तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरिता न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांना मदत करेल तसेच यासाठी पक्षकारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.
तरी संबधीत पक्षकारांनी आपली प्रकरणे दिनांक 7 मे 2022 रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता संबधीत न्यायालयात अर्ज सादर करावा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तसेच जिल्ह्यातील इतर तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपली जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.आर.ए. शेख यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..