ईडीचा राक्षसी कायदा रद्द करा :- छगन भुजबळ यांची मांगणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- ईडीचा राक्षसी कायदा रद्द झाला पाहिजे, अशी मागणी सोमवारी येथे समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त समता परिषदेच्या वतीने आयोजित ओबीसी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना सामाजिक समता पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. भुजबळ म्हणाले की, या कायद्याचा दुरुपयोग वाढला आहे. विशेषत: जी राज्ये बिगरभाजपाशासित आहेत, तिथे याचा मोठा त्रास सुरू झाला आहे. जरा विरोधात बोलले की ईडीची पीडा लागलीच म्हणून समजा. हा लोकशाहीला धोका असून, तो वेळीच दूर केला गेला पाहिजे.
उज्ज्वला गॅस योजना व प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जो डेटा वापरला जात आहे, तो ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी देताना केंद्र सरकार नाक मुरडते, असेही ते म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..