मोठी बातमी ; संजय राऊतांचा ६० , तर खडसेंचा फोन ६७ दिवस टॅप झाल्याची माहिती उघड…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- फोन टॅपिंग प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचा फोन तब्बल ६० दिवस तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांंचा फोन तब्बल ६७ दिवस टॅपिंग करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तसेच, अन्य काही राजकीय मंडळींचेही फोन टॅप केले आहेत का? याबाबत अधिक तपास सुरू आहे.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय मंडळींसह त्यांच्याशी संबंधितांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. यात संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भादंवि कलमांन्वये गुन्हा दाखल करून कुलाबा पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी शुक्लापाठोपाठ राऊत आणि खडसे यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप करण्यात आला होता. तब्बल ६७ दिवस खडसे यांचा फोन टॅप झाल्याची माहिती समोर आली. खडसे यांच्यासोबतच त्यांचा स्वीय सहायक आणि एका कार्यकर्त्याचाही फोन टॅप करण्यात आल्याचे समजते. तर, संजय राऊत यांचा तब्बल ६० दिवस फोन टॅप केल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..