शरद पवारांच्या आशीर्वादामुळेच मी इथं ; नवनीत राणा यांनी पवारांवर उधळली स्तुतीसुमने…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीत.
शरद पवार या महाराष्ट्रचे ग्रेट लीडर आहेत. सगळे जण त्यांना पाहून आपल्या राजकारणाची सुरवात करतात. मला ही त्यांनी आशीर्वाद दिला आहे. मी त्यांची ऋणी आहे. त्याच्याच आशीर्वाद मुळं मी इथं आहे. आम्ही त्यांचं अमरावती कराच्या वतीने स्वागत करणार आहोत. मी त्यांच्या कार्यक्रमाला जाणार आहे. पवार साहेब जिथं जातात त्या सगळ्या बाजू भारी असतात. हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे, असंही नवनीत राणा म्हणाले.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने लढविली निवडणूक
2014 आणि 2019 ची निवडणूक नवनीत राणांनी राष्ट्रवादीचं समर्थन घेऊन लढविली. शरद पवार यांनी नवनीत राणा यांच्यासाठी निवडणुकीत प्रचारसभा घेतल्या होत्या. निवडून आल्यानंतर नवनीत राणा या भाजपच्या समर्थक झाल्या. असं असलं तरी त्यांनी आज शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. शरद पवार हे अमरावती येथे राष्ट्रवादीच्या विभागीय मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्यात शरद पवार काय बोलतात. याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये बळ निर्माण करण्यासाठी तसेच राष्ट्रवादी विदर्भात मजबुत करण्यासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. नवनीत राणा या खासदार आहेत. पण, यापूर्वीच्या निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढविल्या. त्यामुळं शरद पवारांमुळं मी इथं आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. सध्या राणा या भाजपशी जवळीक साधून आहेत. असं असलं तरी पवारांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलंय.
नागपुरातही पवारांचे जल्लोषात स्वागत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सकाळी दहा वाजता नागपूर विमानतळावर उतरले. कार्यकर्त्यांनी पवार यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर पवार अमरावतीच्या दिशेने रवाना झाले. पवारांच्या सुरक्षेसाठी सहा जिल्ह्यातील पोलीस अमरावतीत दाखल झाले आहेत. अमरावती शहरात अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर ग्रामीण येथील पोलीस दाखल झाले आहेत. अमरावतीत 15 पोलीस निरीक्षक, 40 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह 350 पोलीस तैनात आहेत.
सुरक्षेची काळजी घेतली जाईल
रवी राणा म्हणाले, याठिकाणी शरद पवार यांचं स्वागत आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण हा सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. दोन दिवसांपूर्वीची घटना ही महाराष्ट्राला गालबोट लावणारी होती. संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं पवार यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..