कोल्हापुरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा “महाराष्ट्र केसरी”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सातारा :- महाराष्ट्र केसरी कुस्तीचा अंतिम सामना हा कोल्हापूर विरुद्ध मुंबई पार पडला. कोल्हापुरचा पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.
कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या विशाल बनकरचा पराभव केला आहे.
सहा मिनिटांच्या या लढतीत पृथ्वीराज पाटील याने बाजी मारत 5-4 नं मात केली आहे. जवळपास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे. त्यामुळे सध्या कोल्हापूरात जल्लोषाचं वातावरण आहे.
कोरोना महासाथीच्या रोगामुळे गेल्या दोन वर्षापासून या स्पर्धा पार पडल्या नव्हत्या. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेकडे सगळ्यांच्या नजरा लागून होत्या. आता निर्बंधमुक्तीनंतर जनजीवन रुळावर येत असून ही स्पर्धाही साताऱ्यात उत्साहात पार पडली.
महाराष्ट्र केसरी हा राज्यातील सर्वोच्च कुस्ती किताब पटकावल्याबद्दल कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. अनेक मल्लांनी या स्पर्धेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपलं आणि राज्याचं नाव गाजवलं आहे.
पृथ्वीराज पाटील 95 किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….