शरद पवार उद्या अमरावतीत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावती विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवी बळकटी देण्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची स्थिती जाणून घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संवाद बैठक येत्या रविवार 10 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.
या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अन्य जेष्ठ नेते मार्गदर्शन करतील.
विभागातील अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम या पाचही जिल्ह्यातील मंत्रीगण, आमदार, माजी आमदार, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा निरीक्षक, सर्व जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी शरद पवार संवाद साधतील, अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. शरद पवार नागपूर येथून दुपारी 1 वाजता अमरावतीला पोहचतील. त्यानंतर ते हर्षवर्धन देशमुख यांच्या घरी जातील. पावणे दोन वाजता ते सुरेखा ठाकरे यांच्या घरी फिनले मिल कामगारांसोबत चर्चा करतील. अडीच वाजता ते श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला हजर राहतील. सव्वाचार वाजता ते माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतील. त्यानंत ते संवाद बैठकीला उपस्थित राहतील आणि बैठक आटोपल्यावर नागपूरकडे प्रयाण करतील, असे संजय खोडके यांनी सांगितले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..