आंदोलनावर शरद पवार यांची प्रतिक्रिया…. म्हणाले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे.
तसेच चुकीच्या नेतृत्त्वाखाली पाठीशी नाही असेदेखील शरद पवार यांनी म्हटले आहे. नेता चुकीचा असेल तर, त्याचा परिणाम काय होतो, ते आज दिसंल असेदेखील पवार यांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही असेदेखील शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपण आंदोलक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. मात्र, चुकीच्या नेतृत्त्वाच्या पाठीशी नाही. नेता चुकीचा असेल तर, त्याचा परिणाम काय होतो, ते आज दिसंल असेदेखील पवार म्हणाले. कुणी चुकीचा रस्ता दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणे ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, एव्हढंच मी सांगतो असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. संकट आलं की आपण सर्व एक आहोत हेच तुम्ही दाखवले, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.
नेता जर शहाणा नसेल तर कार्यकर्त्यांवर कसा दुष्परिणाम होतोय हे आज दिसल्याचे सांगत पवार म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मतभेद असतात, संघर्ष असतात त्यावर टोकाची भूमिका कधीही न घेण्याची परंपरा आहे. मात्र, गेले काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांना जे काही सांगण्याचा प्रयत्न केला जात होता ते अशोभनीय असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. एसटी कर्मचारी आणि राष्ट्रवादी पक्षाचा गेल्या 50 वर्षांपासून घनिष्ठ संबंध असून, त्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून सुटलेले नाहीत. परंतु, या वेळेला कर्मचाऱ्यांना चुकीचा रस्ता दाखवल्याने कारण नसताना एसटी कर्मचारी घरदार सोडून बाहेर राहिल्याचे ते म्हणाले. या संपाचे नेतृत्व ज्यांनी केले ते यासाठी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….