सिल्वर ओक वरील आंदोलना मागे सूत्रधार कोण हे शोधावे लागेल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलन केले.
यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली. अचानक सुरु झालेल्या आंदोलनामुळे गोंधळ उडाला. ”चिंता वाटावी अशी ही घटना घडली आहे. सिल्वर ओकवरील आंदोलनामागे सुत्रधार कोण आहे हे पहावे लागेल, अशी प्रतिक्रीया शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
चिंता वाटावी असा हा प्रकार आहे, एसटी संपाबाबत सरकारने सर्व उपाय योजना केल्या आहेत. बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. ज्यांच्या डोळ्यात खुपत आहे असे काही लोक असं काही घडवत आहेत. सुप्रिया सुळे समोर जाऊन हात जोडत होत्या तरीही हे आंदोलक ऐकत नव्हते याच्या पाठिमागील सुत्रधार कोण आहे हे शोधावे लागेल, असंही खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज, शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात घोषणा दिल्या.
एसटी कर्मचाऱ्यांना मागे जाण्यासाठी पोलीस (Police) विनंती करत आहेत. पण कर्मचारी शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत आहेत. आम्हाला एसटी विलीनीकरण करायचे आहे. आमची मागणी तिच असल्याचे कर्मचारी सांगत होते.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक या ठिकाणी आंदोनात स्वत: खासदार सुप्रिया सुळे समोर आल्या आहेत. मी सगळ्या आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे. दगडफेक, चप्पल फेक करुन प्रश्न सुटणार नाही, चर्चा करुया तुम्ही सर्वांनी शांत रहा असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही आंदोलक कर्मचारी हे शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात घोषणा देत होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….