शेतीच्या मोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी १५ हजारांची लाच घेतांना धरले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मारेगाव :- शेताची मोजणी करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांसह दोघांना अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडून अटक केली.
या कारवाईने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. बबन सोयाम व अविनाश पाटील अशी आरोपींची नावे आहेत. तालुक्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या शेताची मोजणी करून घ्यायची होती. ही मोजणी तातडीने करून देण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक बबन सोयाम व लिपिक अविनाश पाटील यांनी संबंधित शेतकऱ्याला २५ हजारांची मागणी केली.
त्यानंतर शेतकऱ्याने यापूर्वी पाच हजार रुपये या कर्मचाऱ्यांना दिले. उर्वरित २० हजार रुपयांची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची या कर्मचाऱ्यांनी मागणी केली. त्यामुळे या शेतकऱ्याने थेट अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीची दखल घेत, एसीबीच्या पथकाने मंगळवारी मारेगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचला. यावेळी अविनाश चंद्रकांत पाटील या लिपिकाने १५ हजारांची लाच स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने त्याला व उपअधीक्षक बबन सोयाम याला ताब्यात घेतले. ही कारवाई अमरावती एसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, नायक पोलीस युवराज राठोड, नीलेश महिंगे, सतीश किटकुले यांनी पार पाडली.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….