वर्गात उत्तर पत्रिका घेऊन सुरू होती कॉपी ; राज्यमंत्र्यांच्या कॉलेज मधला प्रकार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- औरंगाबाद जिल्ह्यातील फरदापूर येथील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी हिंदीचा पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांकडून चक्क मास कॉपी होत असतानाचा पाहायला मिळाला.
येथील विद्यार्थ्यांकडून सर्रास कॉपी करताना दिसून आले. या महाविद्यालयात परीक्षार्थी थेट बाकावर पुस्तकाची पाने ठेवूनच उत्तरे लिहीत असताना कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे.
गेल्या महिन्यात दहावीच्या परीक्षेत औरंगाबादेत खुलेआम कॉपी सुरू असल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने समोर आणलं होतं. त्यानंतर विधानसभेत बोलताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संबधीत शाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा करत, यापुढे सुद्धा परीक्षेदरम्यान कॉपी करताना जर कोणी आढळले, तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल अशी तंबी दिली होती. तरीदेखील अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये बारावीच्या परिक्षेदरम्यान मास कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता शिक्षणमंत्री आता सत्तार यांच्या शाळेवर कारवाई करतील का? हे पाहणं महत्वाचे ठरेल.
अशी सुरू होती मास कॉपी…
अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये मंगळवारी बारावीचा हिंदी विषयाचा पेपर झाला. यादरम्यान विद्यार्थी अक्षरशः टेबलवर पुस्तकांचे पान ठेवून उत्तर लिहिताना पाहायला मिळाली. तर काही विद्यार्थी या टेबलावरून त्या टेबलावर उत्तर पाहण्यासाठी फिरतांना पाहायला मिळाली. तसेच वर्गात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्यासाठी बाहेरून सुद्धा काही तरुण प्रयत्न करताना पाहायला मिळाले. तसेच कॉलेजच्या खिडकीच्या बाहेर असंख्य कॉप्यांचा खच पडलेला देखील पाहायला मिळाला.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….