उत्तराखंडच्या आजीबाईची कमाल ; राहुल गांधी च्या नावावर केली स्वतःची संपत्ती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
डेहरादून :- उत्तराखंडमधील एका 78 वर्षीय आज्जींनी आपली सर्व संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना देऊ केली आहे. यामध्ये 50 लाखांची मालमत्ता तसेच 10 तोळे सोन्याचा समावेश असून, राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचे मतही या आज्जींनी व्यक्त केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभेच्या निवडुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
डेहराडून येथील रहिवासी असलेल्या 78 वर्षीय महिला पुष्पा मुंजियाल (Pushapa Munjiyal)P यांनी राहुल गांधींना आपल्या सर्व संपत्तीचे मालक बनवले असून, यासाठी त्यांनी डेहराडून कोर्टात राहुल गांधी यांच्या नावे मालकी हक्काचे वारसापत्र सादर केले आहे. राहुल गांधी यांच्या विचारांचा आपल्यावर खूप प्रभाव असून, त्याचाच एक भाग म्हणून आपण आपली सर्व संपत्ती राहुल गांधींच्या नावावर देत असल्याचे मुंजियाल यांनी म्हटले आहे.
मुंजिलाल यांनी राहुल गांधी यांच्या नावावर केलेले वारसापत्र माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांना त्यांच्या निवासस्थानी दिले आहे, असे काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी सांगितले. मुंजियाल यांच्या संपत्तीमध्ये 50 लाखांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आणि 10 तोळे सोन्याचाही समावेश आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…