मोदीं-शाहांच्या गुजरातमध्ये “आप” किती जागा जिंकणार…? ; सर्वेक्षणातून मोठा आकडा आला समोर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदाबाद :- दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये सत्ता मिळवणाऱ्या आम आदमी पक्षानं आता गुजरातवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकताच गुजरातचा दौरा केला. त्यानंतर आता पक्षानं सर्वेक्षणातून समोर आलेली महत्त्वाची माहिती दिली आहे.
येत्या निवडणुकीत गुजरातमध्ये पक्षाला ५८ जागा मिळतील, असं आपचा अंतर्गत सर्व्हे सांगतो. पक्षानं एका एजन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण केल्याचं आपचे प्रदेश प्रभारी डॉ. संदीप पाठक यांनी सांगितलं. काँग्रेसच्या असंतुष्ट ग्रामीण मतदारांची आपला साथ मिळेल. यासोबतच शहरी भागातील गरीब आणि मध्यम वर्गातील मतदारही आपकडे वळतील अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.
सध्याच्या घडीला आम्ही अशा स्थितीत आहोत की विधानसभेच्या ५८ जागा जिंकू शकतो, असं पाठक म्हणाले. ‘ग्रामीण गुजरातमधील मतदार आम्हाला मतदान करतील. शहरातील गरीब आणि मध्यम वर्गाला बदल हवा आहे. तो आम्हाला मतदान करेल,’ असं पाठक यांनी सांगितलं. पंजाबमध्ये आपनं दणदणीत विजय मिळवला. त्या विजयात पाठक यांचं महत्त्वाचं योगदान आहे. पंजाबमधून आपनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं आहे.
काँग्रेस भाजपचा पराभव करू शकत नाही, असं ग्रामीण जनतेला वाटतं. त्यामुळे तिथला काँग्रेसचा मतदार आपकडे वळेल. सध्याची ही स्थिती आहे आणि निवडणूक जसजशी जवळ येईल, तशी आपकडे वळणाऱ्या मतदारांची संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप सरकारनं राज्यात केलेल्या सर्वेक्षणातून आपला ५५ जागा मिळतील अशी आकडेवारी समोर आल्याचा दावाही त्यांनी केला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….