आझाद मैदानातील आंदोलक एसटी कर्मचारी आक्रमक ; विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बातमी.एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मुंबई महापालिकेबाहेर एसटी कर्मचारी घोषणाबाजी करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झालेच पाहिजे, यावर कर्मचारी ठाम आहेत.
आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची केली आहे. या आंदोलनात महिला कर्मचारीही सहभागी झाल्या आहेत. कर्मचाऱ्याचे आंदोलन सुरु असताना आझाद मैदानात मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. अंघोळ, शौचालयाची गैरसोय होत असल्याने आंदोलन सुरु आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मात्र, आमच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. राज्य सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण करा, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत, असे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…