“मुंडे साहेबांच्या वारसांना हे जमलं नाही” :- धनंजय मुंडेच्या पंकजा मुंडेना अप्रत्यक्ष टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- आज पुण्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आले. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसरात हा उद्घाटन सोहळा पार पडला.
या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लावली. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना टोला लगावला.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे नाव न घेता टीका केली. ‘गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ सुरू होत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी संघर्ष केला. त्यांच्या वारसदारांनाही संधी मिळाली, पण त्यांना हे महामंडळ निर्माण करता आले नाही’, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

‘अजित पवारांमुळे आजचा दिवस शक्य’
ते पुढे म्हणाले की, ‘आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. हा दिवस अजित पवार यांच्या शिवाय शक्यच नव्हता. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड मजुरांसाठी लढा दिला. त्यांच्या कार्यकालात त्यांना हे महामंडळ देणे शक्य झाले नाही. कदाचित हे महामंडळ माझ्या आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हावं, ही नियतीची इच्छा असावी. आजचा कार्यक्रम हा मुंडे साहेबांनी ही आदरांजली आहे’, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
‘…काय तोंड घेऊन आम्ही मंत्रिपदी बसलोय’
ते पुढे म्हणाले की, आज असंख्य ऊसतोड भगिनींचा प्रश्न आहे. चार दिवस कमी होतात म्हणून आमच्या भगिनींचे गर्भायश काढावे लागत असेल तर काय तोंड घेऊन आम्ही मंत्रिपदी बसलोय. आमच्या भगिनींच्या आरोग्याची काळजीही हे महामंडळ घेईल. भगवान गड असेल किंवा बीड जिल्ह्यातील इतर गड असतील हे कोणत्याही मोठ्या माणसांच्या देणगीवर नाही तर ऊसतोड मजुरांच्या देणगीवर मोठे होतायेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…