गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले , म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडी सरकारमध्ये काही ठीक नसल्याच्या चर्चा सध्या जोरदार रंगत आहेत. यातच केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाईचा सपाटा लावला आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण जोरदार पेटल्याचं दिसत आहेत.
केंद्र सरकारच्या तपास यंत्रणाकडून कारवाई होत आहे. पण राज्यात गृह खात्याकडून पावलं उचलली जात नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गृहमंत्र्यांवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. या बातम्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावल्याचं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामर्फत जारी करण्यात आलेलं आहे.
गृहमंत्र्यावर नाराज असल्याच्या चर्चांचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून, माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…