शासकीय कार्यालयात येतांना दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 31 मार्च :- शासकीय, निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक व इतर संस्थांमध्ये कामानिमित्त येणारे दुचाकीस्वार नागरिक तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करावा तसेच इतर वाहन चालकांनाही हेल्मेट वापरासाठी प्रबोधन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालक तसेच वाहनमालकाविरूद्ध 4 एप्रिलपासून परिवहन विभाग व पोलीस विभाग यांचेकडून तपासणी करून मोटार वाहन कायदा व नियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई तसेच अनुज्ञप्ती निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल. हेल्मेट वापराबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दिल्या आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…