राज्यात 1 एप्रिलपासून स्टँप ड्यूटी महागणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 1 एप्रिल 2022 पासून घरांवरील स्टँप ड्यूटीच्या शुल्कात 1 टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबईसह ज्या शहरांमध्ये मेट्रोसंबंधीत बांधकामं सुरु आहेत अशा शहरांमध्ये सरकारने हा निर्णय लागू केला आहे.
सर्वसामान्य नागरिक मेट्रो सेसच्या नावाने हा कर समजू शकतात. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जनतेच्या खिश्यावरील अतिरिक्त बोजा वाढणार आहे. दरम्यान मुंबईत गेल्या काही दिवसांपासून घरांच्या रजिस्ट्रेशचा वेग वाढला आहे.
मेट्रो सेसच्या वाढीपूर्वीच बंपर रजिस्ट्रेशन
सरकारी आकडेवारीनुसार, एकट्या मुंबईत गेल्या महिन्यात 10,379 च्या तुलनेत या महिन्यात आतापर्यंत सुमारे 17 टक्के अधिक म्हणजे 12,619 रजिस्ट्रेशन झाले आहे. म्हणजेच मार्च महिन्यात आत्तापर्यंत सरकारला 836 कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. परिणामी दक्षिण मुंबईतील रजिस्ट्रेशन ऑफिसबाहेर स्टँप ड्यूटी आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनसाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मेट्रो सेस वाढीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नागरिक वेळेत प्रॉपर्टी रजिस्टर करत 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या 1 टक्के करातून सुटका करून घेत आहे. रजिस्टर्ड ऑफिसमध्ये आलेल्यांमध्ये गिफ्ट डीड अंतर्गत प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी आलेल्यांचाही समावेश आहे.
CREDAI- MCHI चे सेक्रेटरी धवल अजमेरा यांनी सांगितले की, युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आता बांधकाम व्यवसायावर परिणाम होत आहे. यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याबरोबरच घरे बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या किमतीतही 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सिमेंट आणि स्टीलचे दर वाढले आहेत. गेल्या 2 महिन्यांत प्रति चौरस फूट 250 ते 300 रुपयांचा फरक पडला आहे. असेच युद्ध सुरू राहिल्यास आगामी काळात सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न आणखी महागणार आहे. अशा परिस्थितीत मेट्रो सेसच्या नावाखाली स्टँप ड्यूटीत वाढ करू नये, अशी विनंती सरकारला केली जात आहे.
घर खरेदी करणे महागणार
पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेले राजू मनवानी यांना विश्वास आहे की, मेट्रो सेस 1 टक्क्यांनी वाढवल्याने आगामी काळात मुंबईत घरं घेणे सर्वसामान्य नागरिकांना महागात पडू शकतो. तर दुसरीकडे युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इमारत बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम बांधकाम व्यावसायिकाकडून इमारतीच्या बांधकाम खर्चावर होत आहे, इमारत बांधण्यासाठी बिल्डर अधिक पैसे घेणार असतील, तर येणाऱ्या काळात ग्राहकांना घर खरेदी करणे कठीण होणार आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यात सिमेंट, स्टील, अॅल्युमिनियमच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्याचं मुंबईतील धातू व्यवसायाशी निगडित लोकांचे मत आहे. किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…