अनिल देशमुखांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार…? ; आमदार अमोल मिटकरी यांचे मोठे वक्तव्य….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
यामुळं आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात नव्या वादांना तोंड फुटलं आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी आक्रमक झाली असून आमदार अमोल मिटकरी यांनी बोचरी टीका केली आहे. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासंदर्भात एक सूचक वक्तव्य केलं आहे. अनिल देशमुखांचे मंत्रिमंडळात लवकरच पुनरागमन होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख यांनी आम्हाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं आहे. अनिल देशमुख यांच्यावर भाजपाकडून कटकारस्थान करण्यात आलंय हे सर्वांना माहीत आहे. चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) स्पष्टीकरण देताना सचिन वाझे (Sachin Waze) सरड्याप्रमाणे कसा रंग बदलत आहे. परमबीर सिंगसारखा भ्रष्टाचारी माणूस देशमुख यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाकडून आयीटी, ईडी (ED) कोणत्याही धाडी टाकल्या तरी काहीही होणार नाही. अनिल देशमुख लवकरात लवकर बाहेर येतील आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, पक्षप्रमुखांच्या घरापर्यंत जर भाजप जात असेल तर, अशांपासून राज्य शाबूत ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीपासून महाराष्ट्र वाचवायला हवा हे पक्षप्रमुखांना माहित आहे. त्याच्यामुळे तानाजी सावंत यांना पक्षप्रमुख योग्य समजवतील. नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेऊ नये असे पक्षाच्या सूचना आहेत. त्यामुळे जी व्यक्ती निष्पाप आणि निष्कलंक आहे, ज्यांना फक्त राजकीय बळी ठरवण्याचे काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पूर्ण टीमनं केलं आहे, ते सर्व परत तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…