शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; मोदी सरकारनं घेतलं “हा” महत्वाचा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.
त्यातच आता शेतकऱ्यांसाठी सुपर अॅप सुरू करण्याचे नियोजन केंद्र सरकार करत आहे. शेतकऱ्यांना पीक, उत्पादन आणि पीक काढणीनंतरचे व्यवस्थापन बाजारपेठ आणि पिकांसाठीचा सल्ला इत्यादी सर्व माहिती या सुपर अॅपमध्ये असणार आहे.
स्मार्टफोन आणि देशभरात पोहोचलेली इंटरनेट सुविधा पाहता शेतकऱ्यांसाठी अनेक अॅप लाँच करण्यात येत आहेत. प्रत्येक अॅप हा वेगवेगळी माहिती देण्याकरिता असतो. त्यामुळे वेगवेगळ्या अॅप्सची संख्या वाढली आहे. सर्वंच अॅप मोबाईलमध्ये ठेवणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांसाठी आता केंद्र सरकार सुपर अॅप ला लॉन्च करत आहे.
शेतीसंबंधित सर्व माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये हवामान, बाजारपेठेचे अपडेटस्, सरकारी योजना, कृषि सेवा आणि देशातील विविध भागांतील शेतीसाठी जारी केलेल्या सल्ल्याची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक अॅप्सचं एकत्रिकरण करून ही सुपर अॅप तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर सुपर अॅपच्या प्रगतीसंदर्भात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये हे अॅप लॉँन्च होण्याची शक्यता आहे. या अॅपमुळे सर्व माहिती शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळू शकते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…