पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मारोती भस्मे सह दोघांची निर्दोष मुक्तता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- खंडणीची मांगनी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेसंदर्भात आरोप असलेले मारोती भस्मे सह दोघांची निर्दोष झाल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी वाय फड यांच्या न्यायालयाने आज सुनावला.
याबाबत न्यायालयीन सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की श्रीरामपूर येथील रहिवासी नितीन शेबे यांना खंडणी मागून त्यांच्यावर चाकूने डोक्यावर वार करून जीवघेना हल्ला करीत लाथा बुक्याने मारहाण करून मारोती भस्मे, दिलीप खैरे, लक्ष्मण खैरे या तिघांनी मिळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेसंदर्भात सन 2010 मध्ये मारोती भस्मे सह दोघांवर भादवि कलम 307 अनुसार पुसद शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करून तपसांआति
दोषारोप पत्र विद्यमान पुसद न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
सदर मामल्यात आरोपींची बाजू अँडव्होकेट माधवराव माने व अँडव्होकेट आदित्य माने यांनी पाहतांना साक्षीदारांची घेतलेली फेरतपासणी व सादर केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून तसेच तपासामध्ये पोलिसांनी जप्त केलेले शस्त्र व सीए रिपोर्ट साठी पाठविण्यात आलेले शस्त्र यात तफावत असल्याचे युक्तिवाद यामध्ये अँडव्होकेट आदित्य माने यांनी सिद्ध करून दाखवले तसेच यासारखे अनेक मुद्दे मोडीत काढल्यामुळे यामधील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मारोती भस्मे, दिलीप खैरे, लक्ष्मण खैरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा निकाल आज विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी वाय फड यांनी जाहीर केला.
सदर मामल्यात आरोपींची बाजू अँडव्होकेट माधवराव माने आणि अँडव्होकेट आदित्य माने यांनी प्रभावीपणे मांडली होती हे विशेष…..

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…