एकाही मुस्लिमाला तिकीट न देणाऱ्या योगींनी एकाला दिलं थेट मंत्रीमंडळात स्थान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- भाजप नेहमीच हिंदूंचं राजकारण करणारा पक्ष राहिला आहे. मुस्लिमांविरोधातील राजकारणाची थेट भूमिका घेणाऱ्या भाजपने यूपीमध्ये एकाही व्यक्तीला तिकीट दिलं नव्हतं.
तरीही योगी आदित्यनाथ यांच्या नव्या मंत्रीमंडळात एक व्यक्ती मात्र, मुस्लिम असूनही मंत्री होणार आहे. दानिश आझाद (Danish Azad) योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील एकमेव मुस्लिम मंत्री ठरले आहेत. दानिश आझाद हे भाजपशी निगडीत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता राहिले आहेत. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश सरकारमध्ये भाषा समितीचे सदस्य राहिलेले दानिश आझाद यांना पक्षाने मोठी जबाबदारी सोपवत भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश महामंत्री म्हणून पद दिलं होतं.
दानिश आझाद यांना आज योगी कॅबिनेटमध्ये सर्वांत युवा मंत्र्यांमध्ये स्थान मिळालं आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी सातत्याने अल्पसंख्यांक समाज आणि युवकांमध्ये राजकारण केलं आहे.
कोणत्याच सदनात सदस्य नाहीत
दानिश आझाद यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अद्याप तरी यूपीच्या कोणत्याच सदनामध्ये सदस्य राहिलेले नाहीयेत. मात्र, त्यांना मंत्री म्हणून पदावर राहण्यासाठी विधानसभा अथवा विधान परिषदेमध्ये सदस्यत्वाची शपथ घ्यावी लागेल.
विद्यार्थी राजकारणापासून सुरुवात करणाऱ्या आझाद यांनी लखनऊ युनिव्हर्सिटीमधून बीकॉम आणि त्यानंतर मास्टर ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास केला आहे. ते जानेवारी 2011 मध्ये भाजपच्या विद्यार्थी संघटनेमध्ये सामील झाले त्यानंतर त्यांनी ABVP आणि RSS च्या तरुणांमध्ये आपलं वजन निर्माण करत वेगळी ओळख तयार केली. भाजपने एकाही मुसलमान व्यक्तीला विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट दिलं नाही. मात्र, मंत्रीमंडामध्ये दानिश आझाद अंसारी यांना राज्यमंत्री म्हणून समाविष्ट केलं आहे. गेल्या योगी सरकारमध्ये अल्पसंख्यांक कल्याण राज्य मंत्री, मुस्लिम वक्फ आणि हज मंत्री मोहसिन रजा यांना यावेळच्या कॅबिनेटमधून बाहेर काढण्यात आलं आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….