शहीद दिनानिमित्त विद्यार्थी युवकांचे शिबीर व पुस्तक प्रकाशन सोहळा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- दि 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने विद्यार्थी व युवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गिताई सेवा केंद्र ,पुसद येथे करण्यात आले होते.तसेच या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र किसान सभा द्वारा प्रकाशित कॉ. निरंजन गोंधळेकर लिखित “शेतकऱ्यांसाठी एम एस पी का महत्वाची?” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी आज किसान सभेचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ. नामदेवराव गावडे यांचं निधन झालं म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ. अमोल गावरशेट्टीवार व उद्घाटक म्हणुन किसान सभेचे कॉ. सुरेंद्र गडदे हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाकप चे राज्य सचिव कॉ तुकाराम भस्मे व किसान सभेचे नेते कॉ अरुण बनकर तसेच मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे राज्यउपाध्यक्ष प्रशांत खंदारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक संघटनेचे जिल्हासचिव निखिल टोपलेवार यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संघटनेचे पुसद तालुकाध्यक्ष समाधान बळी यांनी केले.
“भगतसिंगांचे विचार व देशातील आजची परिस्थिती व आपली जबाबदारी” या विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले. भगतसिंगांना अभिप्रेत असलेला भारत घडवायचा असेल तर विद्यार्थ्यांनी भगतसिंग यांच्या विचारांचे आचरण करावे. नवीन शिक्षण प्रणाली देशातील गरीब , कष्टकरी वर्गाच्या मुळावर असून शिक्षणाचे खाजगीकरण त्वरित रोखले पाहिजे. असे मत कॉ. तुकाराम भस्मे यांनी व्यक्त केले. तर भगतसिंग , सुखदेव, राजगुरू यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जीवदान दिले. भागतसिंगांच्या बाबतीत अनेक अफवा पसरवून खोटा इतिहास जनतेच्या समोर आणण्याचा घाट काही मंडळी कडून करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी व युवकांनी भगतसिंगांचे साहित्य वाचावे. ‘इतनी वाकीफ है मेरी कलम मेरे जजबातो से , मै अगर ईश्क लिखना चाहु तो इन्कलाब लिखती है’ हे भगतसिंगांचे वाक्य समजावून सांगताना प्रशांत खंदारे यांनी सांगितले की, भगतसिंग यांचं प्रेम या देशाच्या स्वातंत्र्यावर होते. तसेच भगतसिंग यांच्या शहीद दिनाचा व्हॅलेन्टाईन डे च्या दिवसाशी काही संबंध नसुन युवकांनी अशा प्रकारचा खोटा इतिहास पसरविणाऱ्याचा डाव हाणून पाडला पाहिजे असेही ते म्हणाले. तसेच कॉ अरुण बनकर यांनी भगतसिंगांची विचारधारा यावर थोडक्यात माहिती सांगितली.
यावेळी पुसद, माहूर, दिग्रस, उमरखेड तालुक्यातील अनेक विद्यार्थी व युवकांनी सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तकांचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एआयवायएफ जिल्हासचिव निखिल टोपलेवार, एआयवायएफ तालुकाध्यक्ष समाधान बळी, आकाश राठोड, कॉ, सुरेंद्र गडदे, कॉ साहेबराव राऊत, विष्णु सरकटे , प्रमोद धुळे, सिपीआय तालुकासचिव अमोल गवरशेट्टीवार , गिताई सेवा केंद्राचे ट्रस्टी बसवराज डोंगरे, राजू गायकवाड, प्रशांत खंदारे ,डॉ खुर्शीद वजुद, आकाश राठोड यांनी अथक परिश्रम घेतले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…