एसटी महामंडळाचे विलीनीकरण नाहीच ; राज्य सरकारने अहवाल स्वीकारला ; संपकऱ्यांना धक्का….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 23 मार्च :- एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी अखेरीस निराशाच पडली आहे.
राज्य सरकारने एसटी विलीनीकरणाचा अहवाल मंजूर केला आहे. एसटी महामंडळ विलीनीकरण शक्य नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या एसटी विलीनीकरणाचा मुद्दा अखेरीस राज्य सरकारने निकाली काढला आहे. आज एसटी विलीनीकरणाच्या अहवालाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
हायकोर्टाच्या आदेशानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल ठेवण्यात आला होता. अहवाल सभागृहात ठेवल्यानंतर आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. शुक्रवारी या अहवाल संदर्भात राज्य सरकारच्या वतीने सभागृहात निवेदन करणार आहे. (तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google या Apps द्वारे चोरी करतोय डेटा) हायकोर्टाने नेमून दिलेल्या या समितीने एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नसल्याचे मत नोंदवले होते.
एवढंच नाहीतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एसटी विलीनीकरण शक्य नसल्याचे सभागृहात स्पष्ट केले होते. त्यानंतर आज हा अहवाल स्वीकारला आहे. (IPL 2022 : विराट कोहली पुन्हा होणार RCB चा कॅप्टन, टीम इंडियाच्या खेळाडूचा दवा) दरम्यान, एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या याचिकेवर मंगळवारी हायकोर्टात सुनावणी पार पडली. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यानं निर्णय घेण्यात उशीर होत आहे.
ST महामंडळ विलिनीकरणाबाबत कॅबिनेटने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्य सरकारला अजून 15 दिवसांची मुदत मिळावी अशी विनंती राज्य सरकारने केली. यावर 1 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करत, 5 एप्रिलला होणा-या पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे कोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले. नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या दरम्यान, नाशिकमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
शिवनाथ फापाडे असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. फापाडे शहापूर आगारात कामाला होते. गेल्या आठ वर्षांपासून फापाडे एसटी महामंडळात एसटी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्माच्याऱ्यांचे विलीनीकरणासाठी आंदोलन सुरू आहे.
विलीनीकरण आंदोलनात फापाडे सहभागी होते. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यात ड्युटी नसल्याने आर्थिक संकट सुद्धा होते. पत्नी आणि तीन मुलं त्यांचा सांभाळ कसा करावा या विवंचनेत आत्महत्या केली असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी म्हटलंय. तर गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….