मोठी बातमी ; परमबीर सिंगांच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाला एक महिन्याची मुदतवाढ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करीत असलेल्या न्या.कैलाश चांदीवाल यांच्या एक सदस्यीय चौकशी आयोगाला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
या आयोगाची मुदत येत्या ३१ मार्च रोजी संपणार होती. आता राज्य सरकारने आयोगास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी बारमालकांकडून वसूल करण्यास सांगितले असल्याची माहिती पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्याला दिली होती असे परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. आपल्याला या पत्रातील आरोपांच्या समर्थनार्थ काहीही सांगायचे नाही असे परमबीर सिंग यांनी आयोगासमोर नंतर सांगितले होते. सचिन वाझे यांना पुढे सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ते तसेच अनिल देशमुखदेखील सध्या तुरुंगात आहेत.

चांदीवाल आयोगाची स्थापना ३१ मार्च २०२१ रोजी करण्यात आली होती. त्यानंर आयोगाला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता आणखी एक महिन्याची मुदतवाढ आयोगाला देण्यासंबंधीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी काढला. चौकशीचे कामकाज अद्याप पूर्ण झाले नसल्याने आयोगाने सरकारकडे ही मुदतवाढ मागितली होती.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…