गुलाम नबी आझाद यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत ; म्हणाले , “आपल्याला समाजात बदल घडवायचं”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहे.
रविवारी जम्मू काश्मीरमध्ये बोलताना त्यांनी असे संकेत दिले. आपल्याला समजात बदल घडवायचा असल्याचंही ते यावेळी म्हणाले. “कधी कधी मी विचार करतो, अचानक एका दिवशी तुम्हाला समजेल की मी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे आणि समाज सेवा करायला सुरूवात केली आहे,” असं त्यांनी नमूद केल.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पाचही राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर जी २३ गटाचे मुख्य सदस्य गुलाम नबी आझाद हे सातत्यानं चर्चेत आहेत. यापूर्वी आझाद यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली होती. तसंच त्यांची भेट घेणं ही काही बातमी नसून आपण सातत्यानं त्यांची भेट घेत अल्याचंही ते म्हणाले होते.
याशिवाय पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतही त्यांनी वक्तव्य केलं होतं. जेव्हा निवडणूक होईल, तेव्हा पक्षाचे कार्यकर्तेच नवा अध्यक्ष कोण हे ठरवतील, असं ते म्हणाले. “राजकीय पक्ष धर्म, जात आणि अन्य बाबींच्या आधारे चोवीस तास विभाजन करू शकतात. मी आपल्या पक्षासह कोणत्याही पक्षाला माफ करत नाही. नागरिकांनी समाजासोबत राहायला हवं,” असंही आझाद म्हणाले. आपण सर्व एकत्र राहूनही ते काम करू शकतो. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं काय आपलं काम नाही का? असा सवालही त्यांनी केला.

महात्मा गांधींचाही उल्लेख
यावेळी बोलताना त्यांनी महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदू आणि धर्मनिरपेक्ष होते यावर आपला विश्वास असल्याचं म्हटलं. तसंच आझाद यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावरही भाष्य केलं. “जम्मू-काश्मीरमध्ये जे काही घडले त्याला पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार आहे, त्याचा परिणाम हिंदू, काश्मिरी पंडित, काश्मिरी मुस्लिम, डोग्रा सर्वांवर झाला आहे,” असं त्यांनी नमूद केलं.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….