“तिथिनुसार शिवजयंती म्हणजे मुंबई मनपा निवडणुकीसाठीचं राजकारण”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार धमुधडाक्यात साजरी करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात केलं होतं. त्यानंतर आज राज्यभरता मनसेकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी केली जातेय.
यानिमित्त स्वत: अमित ठाकरे देखील आज सकाळीच शिवनेरी गडावर दाखल झाले होते. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मात्र तिथीनुसार शिवजयंती साजरी करणाऱ्यांवर टीका केली आहे
अमोल मिटकरी म्हणाले, २००० साली महारष्ट्र शासनाकडून १९ फेब्रुवारी ही अधिकृत तारीख जाहीर झाली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तिथीचा वाद उकरून, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत्या पार्श्वभूमीवर राजकारण करणं आता बंद झालं पाहिजे. राज्याती तरुणांची अशीच इच्छा आहे. शिवाजी महाराज हे तिथी आणि तारखेच्या बाहेर पडून विश्वव्यापक दृष्टीकोनातून पाहावं. हा सर्व प्रयत्न म्हणजे फक्त राजकारण असल्याचं मिटकरी म्हणाले.
दरम्यान, आज मनसेकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे. सकाळी ७ च्या सुमारासच अमित ठाकरे हे शिवनेरीवर दाखल झाले होते. यावेळी ढोल ताशांचा, शिवगर्जनांचा गजर गडावर सुरु असल्याचं पाहायला मिळालं. तर राज्यभरातून शिवप्रेमी याठिकाणी दाखल झाल्याचीही माहिती मिळतेय. या अनुषंगाने गडावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर राज्यात इतर ठिकाणी देखील मनसेकडून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता अमोल मिटकरींनी केलेल्या टीकेवर मनसेकडून काय उत्तर मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे…

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….