हिजाब प्रकरणातील निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी ; दोघांना अटक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बेंगळुरु :- कर्नाटकच्या एका महाविद्यालयात हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थींनींना रोखण्यात आल्याने देशभरात एक मोठा वाद उभा राहिला होता.
अखेर हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने या प्रकरणाचा निवाडा केला. महाविद्यालयात हिजाबवर बंदीचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) १५ मार्च रोजी दिला. त्यानंतर आता या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांनाच धमकी देण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी या प्रकरणात तिरुनेलवेली येथून कोवई रहमतुल्लाह, तर एस. जमाल मोहोम्मद उस्मानी या ४४ वर्षीय व्यक्तीला तंजावर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कर्नाटक हायकोर्टाच्या तीन सदस्यीय पीठाने हा निकाल दिला आहे. हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, त्यामुळे महाविद्यालयात येताना विद्यार्थींनींना हिजाब घालता येणार नाही, असा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. तसंच यावेळी शैक्षणिक संस्थांनी ठरवलेल्या गणवेशाचं पालन करण्यास सांगणारा कर्नाटक सरकारचा ५ फेब्रुवारीचा आदेशही न्यायालयानं कायम ठेवला.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात अनेक धार्मिक अल्पसंख्याक समुदाय तामिळनाडूमध्ये निदर्शनं करत आहेत. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये गुरुवारी निदर्शनादरम्यानची अशीच एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये तामिळनाडू तौहीद जमात (TNTJ) ऑडिटींग कमिटीचे सदस्य कोवई रहमथुल्ला हे कथितपणे म्हणाले की ‘चुकीचा’ निर्णय देणार्या न्यायाधीशाची झारखंडमध्ये मॉर्निंग वॉक दरम्यान हत्या करण्यात आली आहे. आमच्या समाजात काही भावनिक लोक आहेत. तसंच न्यायाधीशांना धमकी देत तो म्हणाला की, “कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर काही झालं तर…भाजप आम्हाला दोष देण्यासाठी तयार आहेच.”

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….