हा देवेंद्र फडणवीसांचा “बी-प्लान” ; एमआयएम ला घुसवून महाविकास आघाडी तोडण्याच्या डाव ; औरंगाबादेत खैरे यांचा आरोप…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- महाविकास आघाडी सरकारसोबत एमआयएम ने निवडणूक लढवायची तयारी दर्शवली आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आज ढवळून निघत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel ) यांनी राज्यातील राजकारणातील या नव्या समीकरणाचे सूतोवाच केले.
मात्र भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचाच (Devendra Fadanvis) हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा बी प्लॅन आखला आहे, यामुळे शिवसेना आक्रमक होईल, महाविकास आघाडी तुटेल, असे त्यांचे मनसुबे आहेत. पण भाजपची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
राजेश टोपे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या बैठकीत सदर प्रस्तावाची चर्चा झाल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले,’ MIM आम्हाला देऊच शकत नाहीत. शिवसेना कधीही त्यांच्यासोबत जाणार नाहीत. संजय राऊत म्हणाले, त्याप्रमाणे जे औरंगजेबासमोर गुडघे टेकतात, त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाहीत. ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांना आमच्याच औरंगाबादमधल्या सोनेरी महालात चार महिने डांबून ठेवलं होतं. आम्ही कसं सहन करणार? म्हणूनच शिवसेना प्रमुखांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं. त्यामुळे ही यांची छुपी ऑफर आहे. आमचे जुने मित्र देवेंद्रजी फडणवीस यांची ही कल्पना आहे, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं.
देवेंद्रजींचा हा B Plan!
चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमच्या या ऑफरच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचा दावा केला. ते म्हणाले, भाजपने हे सरकार पाडण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र 2024 पर्यंत काही होत नाही, असे त्यांना कळाले. आता त्यांनी 2024 ची तयारी सुरु केली आहे. पण तोपर्यंत काय करायचे, म्हणून असा प्रकार सुरु केला. एमआयएमशी त्यांचं आतून टायअप झालं असेल. अशा वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक होईल आणि आघाडी तुटेल, असा डावपेच आखला आहे. देवेंद्र फडणवीसजी खूप बुद्धीवादी आहेत. आहेत. त्यांच्याच डोक्यातील ही कल्पना आहे. त्यांचा हा बी प्लॅन आहे, असं वक्तव्य खैरे यांनी केलं.
इम्तियाज जलील यांना काय अधिकार?
महाविकास आघाडीत येण्याविषयी वक्तव्य करण्याचा खासदार इम्तियाज जलील यांना काय अधिकार आहे, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला. ते म्हणाले, ‘ शहरात काय काम आहे MIM चं? शहरातले मुस्लिम बांधव, बाकीचे नागरिक त्यांना कंटाळले आहेत. काम करत नाहीत म्हणून चला महाविकास आघाडीत जाऊ, असं वाटतंय त्यांना. पण त्यांना अजिबात चान्स नाही. महाविकास आघाडी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच राहिल. ती सतत चांगलं काम करेल, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..