शेत तळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू ;
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
मित्रांसोबत शेततळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (ता.१९) महागाव तालुक्यातील गुंज – माळकिन्ही शिवारात उघडकीस आली आहे. अक्षय दादाराव जाधव (२४ )असे मृतक तरुणाचे नाव नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,
अक्षय जाधव व त्याचे दोन मित्र धुलीवंदनाचा सण (ता.१८) साजरा करून पोहण्यासाठी माळकिन्ही रोडवर असलेल्या डूबेवार यांच्या शेततळ्यावर गेले. मृतक अक्षय ने पाण्यात उडी घेतली.पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. सोबत असलेल्या दोन्ही मित्रांच्या हे लक्षात आले.त्यांनी तात्काळ गावाकडे धाव घेतली.घटनेची माहिती नागरिकांना दिली.मात्र अक्षय चा थांगपत्ता लागला नाही. नागरिकांनी अक्षयला शोधण्याची मोहीम हाती घेतली.
याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी यवतमाळ आणि नागपूर येथील रेस्क्यू टीम पाचारण केली.परंतु रेस्क्यु टीम पोहोचण्यापूर्वी आज (ता.१९) सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी नागरिकांच्या अथक प्रयत्नांनी अक्षय मृत अवस्थेत पाण्यात दिसून आला.वृत्त लीहेपर्यंत
घटनेची फिर्याद अद्याप महागाव पोलीस स्टेशनला देण्यात नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..