शरद पवारांकडून भाजप नेत्यांवर कौतुकाचा वर्षाव , म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) घवघवीत यश मिळवलं. पाच पैकी चार राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली. भाजपच्या या विजयानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळत आहे.
2024 च्या निवडणुकीत भाजप पुर्ण बहुमताने सत्तेत येईल, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
भाजप नेत्यांच्या या दाव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तरूण आमदारांशी बोलताना शरद पवारांनी भाजपवर टीका केली. भाजपकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका. मी भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तर यावेळी पवारांनी भाजप नेत्यांचं कौतुक देखील केलं.
भाजप आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला तरी आपण त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. परिश्रम घेण्याची तयारी, नियोजन हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, असं म्हणत शरद पवारांनी भाजप नेत्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांनी गुरूवारी त्यांच्या निवासस्थानावर दोन बैठकी घेतल्या. सकाळी शरद पवार महाविकास आघाडीतील तरूण आमदारांना भेटले. त्यानंतर पवारांनी संध्याकाळी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..