शरद पवार यांनी बोलावली राष्ट्रवादीची बैठक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली. आज सायंकाळी 5 वाजता मुंबईत ही बैठक पार पडणार आहे.
यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) सभागृहात ही बैठक पार पडेल. या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित असणार आहे.
बैठकीत कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बोलावलेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवरती चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून (BJP) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर करण्यात येत असलेले आरोप, नवाब मलिकांना झालेली अटक आणि त्यानंतर भाजपकडून मलिकांच्या राजीनाम्यासाठी होत असलेली जोरदार मागणी या मुद्द्यांवरती चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यासोबतच नुकत्याच देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2022) चार राज्यांत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. या विजयांमुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा आत्मविश्वासही वाढला. भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती होणारे आरोप, गुन्हे दाखल, ईडी, आयकर विभागाची धाड या वरुन राज्याचं वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व मुद्द्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..