असा निर्णय कुणीच घेतला नसेल ; पंजाबचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात इतिहासिक घोषणा करणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंदिगढ :- पंजाबच्या जनतेच्या हितासाठी आज एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली आहे.
मान यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पंजाबच्या इतिहासात आतापर्यंत कोणीच असा निर्णय घेतलेला नसेल. काही वेळातच घोषणा करेन, असं मान यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भगवंत मान यांनी कालच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. क्रांतीकारक भगतसिंग यांचं गाव असलेल्या खटकर कलां येथे शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. भगवंत मान पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री आहेत. मान यांनी दोनवेळा संगरुर लोकसभा मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधीत्व केलं आहे.

गेल्याच आठवड्यात पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. आपनं ११७ पैकी ९२ जागा जिंकत पंजाबची सत्ता मिळवली. आपच्या झाडूनं जोरदार साफसफाई केल्यानं काँग्रेसच्या हातून पंजाबची सत्ता गेली. गेल्या निवडणुकीत ७७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ १८ जागांवर यश मिळालं. दिल्लीपाठोपाठ आपनं पंजाबमध्ये आपला सत्ता मिळाली आहे. यानंतर आता आपनं गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..