यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेत खरेदीच्या भष्ट्राचार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- यवतमाळच्या ‘मिनी मंत्रालया’त Yavatmal ZP साहित्य खरेदीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी केला असून, याबाबत मी आयुक्तांकडे जाणार आहे.
आयुक्तांकडून न्याय न मिळाल्यास हायकोर्टातही जाणार असल्याचे बुधवार, 16 मार्च रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले.
पुढे बोलताना जयस्वाल यांनी, महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधापासून जवळपास मुक्त झाला. आपल्याही जिल्ह्यात दहावीची परीक्षा ऑफलाईन झाली असे असताना फक्त सर्वसाधारणच सभा ऑनलाईन का, असा प्रश्न उपस्थित केला. शासनाने ज्या जिल्ह्यात 70 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी प्रतिबंध कमी केले आहे. आपल्या जिल्ह्यात लसीकरण पूर्ण झाले नाही तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी प्रशासनावरही ताशेरे ओढले.
जिपमध्ये विशेष सर्वसाधारण सभा विषय क’मांक 16 ते 19 हे (15 वित्त आयोग) अंतर्गत सौर ऊर्जा दिवे (सोलर लाईट) बसविण्याचे असून, एक निविदा 121 कामे व दुसरी निविदा 126 कामांची दोन वेगवेगळी निविदा व वेगवेळ्या तांत्रिक मान्यता का करण्यात आल्या व या तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता कोणी दिली असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर जिल्हा नियोजन समिती 2021-22 चा शाळा दुरुस्ती व वर्ग खोली यामध्ये यू-डायस या शासकीय सिस्टीमला डावलून प्राथमिक शिक्षणाधिकार्याने चुकीच्या गावांना व चुकीच्या शाळांना वर्ग खोली व वर्ग शाळा दुरुस्ती तसेच मानव विकास मिशन अंतर्गत मिळालेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे. यात दारव्हा तालुक्यामध्ये शिक्षण सभापतीच्या गावांमध्ये काम न झालेल्या व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कामे थांबविलेल्या गावांना ग्रामसेवक व बीडीओ यांच्या बोगस तयार केलेल्या बँकेच्या खात्यांवर निधी जमा करून भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
सेसफंडातून प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग, आसन पट्टी, डेक्सबेंचमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत आयुक्त कार्यालयात तक्रार करणार आहे. आयुक्तांकडून न्याय न मिळाल्यास हायकोर्टात जाऊन न्यायासाठी लढाई लढणार असल्याचे श्याम जयस्वाल यांनी सांगितले. त्याचबरोबर सत्ताधार्यांना थेट आव्हान करत मी माझ्या कार्यकाळात एक जरी अपहार केला असेल तर दाखवून द्या, मी राजकारण सोडून देता असे खुले आव्हानच केले.
राजकीय द्वेषापोटी आरोप
जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या खरेदीमध्ये कुठेही अपहार झाला नाही. विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप हा केवळ राजकीय द्वेष ठेवून करण्यात आले आहेत. यामध्ये कोणताही खरेपणा नाही, अशी प्रतिकि’या यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांनी दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..