नारायण राणे व नितेश राणे यांना मोठा दिलासा ; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राणे पिता-पुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 16 मार्च :- दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल झाला होता.
हा गुन्हा दाखल होताच राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. (Dindoshi court gives anticipatory bail to Narayan Rane and Nitesh Rane) अटकपूर्व जामीन मंजूर होताच आमदार नितेश राणे यांनी म्हटलं, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मला.. आम्हाला दोघांनाही दिशा सालियनच्या प्रकरणात आम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. हा जामीन काही अटी-शर्थींसह आहे.
अद्याप अंतिम ऑर्डर हातात मिळालेली नाहीये पण अटी शर्थी टाकण्यात आल्या आहेत. मी न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी लोकशाहीत आम्हा लोकप्रतिनिधींना दिलेले अधिकार आहेत, कुणावरही अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवणं हा आम्हाला अधिकार मिळाला आहे त्या अधिकाराला अबाधित ठेवण्याचं काम आज न्यायालयाने केलं आहे. नितेश राणे यांनी पुढे म्हटलं, या महाविकास आघाडी सरकारने जे काही षडयंत्र आमच्या विरोधात रचलं, जो काही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. दिशा सालियनच्या आई-वडिलांवर दबाव आणल्याचं आम्ही ऐकत आहोत.
पण आता न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. यापुढेही जिथे-जिथे अन्याय होत असेल तिथे आवाज उठवण्याचं काम आम्ही करणार आहोत. काय आहे प्रकरण? दिशा सालियन यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृत्यू संदर्भात ती आत्महत्या नसून खून झाल्याचं तसेच तिच्यासोबत गैरकृत्य झाल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पत्रकार परीषदेत जाहीररित्या सांगितलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या दिशा सालियन यांच्या पालकांनी आधी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
नारायण राणें विरोधात मुंबईत गुन्हा दाखल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुंबईतील मालवणी पोलिसांत (Malvani Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांच्यासोबत आमदार नितेश राणे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत काही विधाने केली होती. दिशा सालियनची बदनामी केल्याचं सांगत तिच्या आई-वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर महिला आयोगाकडून नारायण राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..