शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्री राऊत यांची आणखी एक मोठी घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शेतकऱ्यांची मागणी व अडचणींचा विचार करता शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्री यांनी विधानसभेत आजही एक घोषणा केलीय. काल ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीज पुरवठा खंडीत केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पुर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा केली होती.
पुढील 3 महिने या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. तसेच, थकबाकीपोटी कृषी ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय घेण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांनतर आज पुन्हा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे आणखी एक मोठी घोषणा केलीय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वीज देण्यात येणार आहे. यामुळे जास्त भार असलेली विजेची मागणी कमी होईल. या योजनेनुसार शेतकऱ्यांना आपल्या पडीक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प टाकून विजेची संधी उपलब्ध होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना वीज जोडणी देण्यासाठीची योजना करण्यात आली आहे. फक्त ५०० रुपये भरूनही ही वीज जोडणी देण्यात येणार आहे. हजारो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला असून या योजनेलाही यासाठीची मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री यांनी केली.
त्याचसोबत उपसा जलसिंचन योजनेची थकीत कृषी बिल पंप ३ महिने तोडण्यात येणार नाहीत. तसेच, वीज पुरवठा दिवसाही चालू ठेवण्यात आयोवा अशी मागणी कऱण्यात आलाय होती. त्याचा विचार करून वीज पुरवठा दिवसाही अखंडितपणे सुरु ठेवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..