फडणवीसांच्या टीकेला विधानसभेत अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर , म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 11 तारखेला राज्याचं बजेट विधानसभेत मांडलं. त्यावेळी त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. अजित पवारांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पावर भाजपने टीका केली होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अर्थसंक्लपावर नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. अर्थसंकल्पात राष्ट्रवादीला जास्त पैसे मिळाले तर शिवसेना आणि काँग्रेसला कमी पैसे मिळाल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं.
त्यावर आता अजित पवारांनी फडणवीसांना सडेतोड उत्तर दिलं आहे. जेव्हा आपण अर्थसंकल्प तयार करतो तेव्हा त्यावर मुख्यमंत्र्यांची सही असते आणि संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मान्यता देतं, असं पवार म्हणाले.
सरकार चालवायचं म्हटलं आणि टिकवायचं म्हटलं तर अशा प्रकारे भेदभाव करुन चालत नाही. भेदभाव केला तर सरकार चार दिवसही चालणार नाही, असं देखील अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीतील पक्षांचे काही सदस्य अर्थसंकल्पाच्या खोलात न जाता नुसता पेपर वाचून अरे हे काय चाललंय, असं म्हणतात. सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता आहात, असं म्हणत अजित पवारांनी भाजपला सुनावलं.
काहीतरी सांगून तुम्ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात. यासाठी काड्या लावायचंही काम विरोधी पक्षाकडून सुरु असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, फडणवीसांच्या टीकेवर अजित पवारांनी रोखठोक उत्तर दिल्याने आता राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..