ग्राहक संरक्षण कायद्याने दिलेल्या अधिकाराचा नागरिकांनी पुरेपुर लाभ घ्यावा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 15 मार्च, :- ग्राहकांना प्रत्येक स्तरावर गुणवत्तापुर्ण व चांगली सेवा मिळावी हा ग्राहकांचा हक्क असून ग्राहक संरक्षण कायद्याने आपल्याला दिलेल्या अधिकाराचा नागरिकांनी पुरेपुर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जागतिक ग्राहक दिनानिमित्त अन्न औषध प्रशासन विभाग, वैधमापन शास्त्र विभाग, एस.टी. महामंडळ, प्रादेशिक परिवहनअधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारत संचार निगम लिमीटेड, आरोग्य विभाग , विद्युत वितरण कंपनी, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप्स व कृषी विभाग यांचे मार्फत केमीस्ट भवन, शिवाजी नगर, आर्णी रोड यवतमाळ येथे ग्राहक प्रबोधन व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते. यावेळी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे यांचे हस्ते सदर ग्राहक प्रबोधन व प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसिलदार कुणाल झाल्टे, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे प्रांत अध्यक्ष नारायणराव मेहरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजेन्द्र निमोदीया प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाले की आपण ग्राहक म्हणून मुल्य देवून वस्तु घेतो, त्या मुल्यानुसार योग्य गुणवत्तेची वस्तु आपल्याला मिळावी हा ग्राहकाचा अधिकार आहे. सद्या ईकॉमर्स द्वारे वस्तु खरेदी करण्याचे चलन वाढले असून ई-व्यवहारासाठी देखील ग्राहक संरक्षण कायदा लागू आहे. ऑनलाईन व्यवहार करतांना नागरिकांनी फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, आपला आधार कार्ड नंबर, ओटीपी नंबर व बँक खात्याशी संबधीत माहिती कोणाला देवू नये, याबाबत दक्ष राहावे. शासनाच्या अन्न औषध विभाग, वजन मापे, पुरवठा विभाग, सायबर क्राईम व इतर विभागांनी देखील त्यांच्या विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती व ग्राहकांचे अधिकारराबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून ग्राहकांमध्ये त्यांच्या अधिकाराबाबत जागृती होईल. तसेच अन्यायग्रस्त नागरिकाच्या तक्रारी शासनापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नंदकुमार वाघमारे यांनी ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांनी ग्राहक आयोगाकडे यावे, त्यांना आवश्यक मदत करण्यात येईल असे सांगितले. तर प्रा. नारायण मेहरे यांनी सुशिक्षीत नागरिकांनी समाजहितासाठी ग्राहक चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजेन्द्र निमोदीया यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी व ग्राहक सक्षम व्हावा यासाठी ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन शिल्पा नगराळे यांनी केले.
कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, ग्राहक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..