रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा ओबीसी संघटनेतर्फे जोडे मारो आंदोलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सातारा :- भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिकांच्या बाबतीत नुकतेच एक विधान केले. त्या विधानाच्या निषेधार्थ आज सातारा जिल्ह्यातील ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी पदाधिकाऱ्यानी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून नाभिक समाजाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणाबाजीही केली.
सातारा जिल्ह्यातील ओबीसी संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकसरी कार्यालयाबाहेर मंत्री दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी केलेल्या आंदोलनात नाभिक समाज संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून निषेध नोंदवला.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या निषेध आंदोलनावेळी मागणीही केन्यात आली. त्यामध्ये भाजप नेते तथा मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा येत्या आठ दिवसांत दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी राज्यातील लाखोंच्या संख्येने नाभिक समाज मुंडन करून आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..