देवेंद्र फडणवीसाच्या चौकशीच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यभर आंदोलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी होणार आहे. त्यांना आधी चौकशीसाठी आज सकाळी ११ वा. वांद्रे (Bandra) कुर्ला (Kurla) संकुलातील सायबर (Cyber) पोलीस ठाण्यात (Complex) बोलावलं होतं.
मात्र भाजप चांगलीच आक्रमक झाल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला न बोलवता त्यांच्या घरी जावून त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
देवेंद्र फडवणीस यांना नोटीस पाठवल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. राज्यभर भाजपा कार्यकर्ते नोटीस जाळत सरकारचा निषेध करत आहे. सांगली जिल्ह्यातील झरे गावात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोटीस जाळत सरकारचा निषेध केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा कार्यकर्तेही उपस्थित होते.
याच प्रकरणी अमरावती शहर भाजपाच्या वतीने अमरावती शहरातील राजकमल चौकात भाजप नेते व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर, देवेंद्र फडणवीस यांना मिळालेल्या नोटीसची भाजपने होळी करून निषेध नोंदवला. यावेळी आंदोलनात भाजप आमदार प्रताप अडसळ, भाजप जिल्हाध्यक्ष, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, केवळ सांगली व अमरावतीच नव्हे नव्हे तर पुणे, औरंगाबाद यांसह संपूर्ण राज्यभर ह्या कारवाईचा निषेध करण्यासाठी ही नोटीस जाळून आंदोलन करण्यात येत आहे

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..