“आरोपी म्हणून फडणवीसांना नोटीस नाही , भाजपानं दंगा करायचं कारण नाही”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पोलीस बदली अहवाल लीक प्रकरण आणि देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत माहिती दिली आहे. मुंबई पोलीस एसआयटी मधून हा डाटा बाहेर कसा गेला आणि त्याला जबाबदार कोण याची चौकशी करणार आहेत.
मुंबई मध्ये सायबर सेल मध्ये गुन्हा रजिस्टर झाला तो 2021 मध्ये… आणि डेटा बाहेर कसा गेला हा विषय आहे याची चौकशी सुरु आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा दाखला झाला आहे. आतापर्यंत 24 साक्षीदार यांची साक्ष घेतली आहे.
यावेळी दिलीप वळसे पाटलांनी म्हटलंय की, गुप्त माहिती बाहेर पसरवण्यात आली. त्यासंदर्भात फडणवीसांचा जबाब नोंदवण्यात काही गैर नाही. राज्य विभागाची गुप्त माहिती बाहेर पसरवल्याबाबत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती बाहेर कशी गेली हा विषय आहे. ही माहिती प्रसिद्ध करायची कि नाही करायची हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, चौकशी झाली म्हणून भाजपला दंगा करण्याचं काही कारण नाही. फडणवीसांना समन्स पाठवलेलं नाहीये. आज त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब घेण्यात आला आणि यात गैर काहीच नाही. यासंदर्भात उगाच गोंधळ करण्याची गरज नाही. त्यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवलेली नाही. फडणवीस यांना तो डेटा कुठून मिळाला हे तपासलं जातंय.
देवेंद्र फडणवीसांची तापसभर चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी म्हटलंय की, गुप्त माहिती बाहेर पसरवण्यात आली आहे. त्यासंदर्भात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीच फडणवीसांना पाच-सहावेळा नोटीस पाठवली होती. मात्र, ही नोटीस म्हणजे समन्स नाहीये. गुप्त माहिती बाहेर पसरवण्यात आली आहे. राज्य विभागाची माहिती बाहेर गेल्यानं गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..