राज्यचा सरकार पडणार की फुटणार , चर्चेला उधान…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेल्या वादाने आता तीव्र स्वरुप धारण केलं असून, पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमुळे (Assembly Election Results) त्यात आणखी भर पडली आहे.
त्यानंतर आज वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची खलबतं सुरु झाली आहेत. तर त्याचवेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या एकूण हालचालींचा प्रत्यक्षपणे काहीही संबंध आहे की नाही, हे स्पष्ट नसलं तरी, पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा सध्या राज्यात सुरु आहेत. त्यातच काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी थेट सरकार कुठल्याहीक्षणी पडू शकतं असं म्हटल्याने राज्यात येणाऱ्या काळात राजकीय उलथापालथ होणार असल्याची शक्यता वाढली आहे.
काय आहेत चर्चेची कारणं?
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही आमदार घेऊन नव्यानं बहुमत निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत. यापूर्वीही हे प्रयत्न होत होते, मात्र तेव्हा ते शक्य झालं नाही. मात्र आता चार राज्यांत भाजपची सत्ता आल्यानं भाजपचा उत्साह चांगलाच वाढलाय असं मत कुमार केतकर यांनी व्यक्त केलं. एवढ्यावरच न थांबता राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकतं असं स्पष्ट मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे या निवडणुकांचे निकाल, राज्यातल्या हालचाली, तपास यंत्रणांच्या कारवाईबद्दल पंतप्रधान मोदींनी केलेलं वक्तव्य आणि केतकराचं विधान. या चारही गोष्टींवरून राजकीय उलथापालथ होणार असल्याची शक्यता बळावली आहे.
फडणवीसांकडून महाविकास आघाडीला हादरा
राज्यातील भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी आजवर अनेकदा सरकार पडणार असल्याचं वक्तव्य केलं. सरकार पडणार असल्याच्या थेट तारखा देखील त्यांनी सांगितल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या सर्व शक्यता धुडकावून लावल्या होत्या. त्यातच राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडत सरकारला आणखी एक हादरा दिला.
राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं भाजप वारंवर बोलत आल्याचं दिसलं आहे. तर आता या हालचालींमुळे या शक्यता बळावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस या मुद्दयावर बोलताना म्हणाले की, २०२४ ला राज्यात पुर्ण बहुमतांचं सरकार आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, मात्र त्यापूर्वी जर सरकार पडलंच, तर आम्ही सरकार स्थापन करू असंही फडणवीसांनी सांगितलं.
पाच राज्यांच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींनी केलेलं वक्तव्य
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये पंजाब वगळता भाजपला मोठं बहुमत मिळालं. हे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आगामी २५ वर्षांच्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची आखणी करणारे आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. येणाऱ्या काळात भारतात घराणेशाहीच्या, भ्रष्टाचाराच्या राजकारणाचा सूर्यास्त होईल, हे या निवडणुकीतून दिसलं आहे. भ्रष्टाचारावर कारवाई केली तर, असे लोक आरडाओरडा करून व एकजूट होऊन तपास करणाऱ्या संस्थांवरच दबाव टाकतात हे देशाचं दुर्दैव आहे, असंही मोदी म्हणाले. त्यामुळे आता तपास यंत्रणांची कारवाई आणखी आक्रमकपणे होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..