शेतकऱ्यांसाठी ५० हजाराऐवजी ७५ हजार अनुदान :- अजित पवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर केला जात आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
५ राज्यात विधानसभा (Assembly) निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले आहेत. या ५ राज्यामध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. ५ पैकी ४ राज्यामध्ये भाजपाने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे पुढील काळात राज्यातल्या अनेक शहरातील महापालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत
या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी (farmers) महत्त्वाच्या घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, नियमितपणे कर्जफेक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा २०२० मध्ये करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या संकटाने त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. मात्र, आता २०२२-२३ च्या आर्थिक वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या घोषणा आहेत. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे क्षेत्र आणि ६० हजार कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. पीक कर्ज वाटपामध्ये वाढ करण्यात येणार आहे. पुढील २ वर्षामध्ये १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहेत. कोकण आणि परभणी विद्यापीठाला ५० कोटी रुपये देण्यात येणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..