मोठा निर्णय ; फिजिओथेरपी वैद्यकीय अभ्यासक्रमात येणार :- अजित पवारांची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली असून, पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रात फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्याशिवाय आरोग्य क्षेत्रासाठी 11 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. यामध्ये सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध करून देणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारणार असल्याचे सांगत ते म्हणाले की, नाशिक नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण संस्था उभारण्यात येणार असून पुणे शहराजवळ 300 एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याची घोषणादेखील यावेळी अजित पवार यांनी केली आहे.
मुंबईतील सेंट जॉर्ज, नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरमधील बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे. देशातल्या तरुणांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारण्यात येणार असून, टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगडमधील खानापूर येथे जमीन देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय अभारण्यात येणार असून, 3 हजार 183 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..