शुल्लक कारणावरून आठवडी बाजारात युवकावर जिवघेणा हल्ला ; ७० रूपयाचा वाद गेला विकोपाला
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
उसनवारीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणावर जिवघेणा हल्ला करण्यात आला.ही घटना आज (ता.११) महागाव शहरातील आठवडी बाजारात दुपारी ५ वाजताच्या घडली आहे. या हल्यात विकास राजू बनसोड (२४) गंभीर जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी सुरज प्रकाश पवार (२०) याच्याकडे जखमीच्या मित्रांचे ७० रुपये होते. ते मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेले असता शाब्दीक वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.आरोपी सुरज पवार ने भर बाजारात राजू बनसोडे याच्या डोक्यावर बॅट ने जबर प्रहार करिता गंभीर जखमी केले . आठवडी बाजारातील काही लोकांनी मध्यस्थी केली. दम्यान आरोपीने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना देताच सहायक पोलिस निरीक्षक संजय खंदाडे, उपनिरीक्षक उमेश भोसले व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रथम जखमी ला उपचाराकरीता सवना येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले .परंतु जखमी ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळ येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले .आरोपींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून वृत्तलेपर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पुढील तपास महागाव पोलीस करीत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..