ईडी च्या वसूली रॅकेटची पोलीस करणार चौकशी ; संजय राऊत यांच्या भाजपावर पुन्हा हल्लाबोल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- प्राप्तिकर विभाग आणि ईडीच्या माध्यमातून भाजपने चालविलेली भानामती शिवसेना उघड करेल. हा खंडणी उकळण्याचाच प्रकार असून या वसुली रॅकेट विरोधात मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली असून लवकरच ईडीचे काही अधिकारी तुरूंगात असतील, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खा.संजय राऊत यांनी मंगळवारी केला.
शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत राऊत यांनी ईडीचे मुंबई व दिल्लीतील काही अधिकारी आपल्या वसुली एजंट मार्फत कोट्यवधींची वसुली करत आहेत. ईडीच्या माजी संचालकांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते आता भाजपच्या तिकिटावर लखनऊमधून निवडणुक लढवीत आहेत. भाजपच्या ५० उमेदवारांचा खर्च त्यांनी केल्याची चर्चा असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या खंडणीखोरीची संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे. २८ फेब्रुवारीला तेरा पानी पत्र पाठविले आहे, याकडे लक्ष वेधत मी पंतप्रधानांना आता फक्त एका भागाचीच माहिती दिली आहे. अशा दहा भागांची माहिती मी त्यांना देणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.
नवलानी वसुली एजंट
जितेंद्र चंद्रलाल नवलानी ही व्यक्ती ईडीच्या अधिकाऱ्यांसाठी वसुलीचे काम करतो, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला. ईडीची कारवाई सुरू होताच नवलानींच्या कंपन्यांमध्ये कोट्यवधींची रक्कम जमा केली जाते. ज्या कंपन्या बँकेचे कर्जाचे पैसे देऊ शकत नाहीत त्या कंपन्या इडीची चौकशी सुरू होताच या खात्यांवर इतके पैसे का जमा करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..