मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा , विधान परिषदेत बसूनच बोलणार ; प्रकृतीच्या कारणामुळे केली विनंती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
त्यातच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानसभेत व्हिडीओ बॉम्ब फोडला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा हादरा बसला आहे. विशेष सरकारी वकिलाच्या दालनात बसून सरकार विरोधकांविरुद्ध षडयंत्र रचतंय असा दावा फडणवीसांनी सभागृहात केला.
विरोधकांच्या या दाव्यानंतर सत्ताधारी पक्षाने सावध भूमिका घेतली आहे. अशावेळी सरकारचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आता अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नाना झिरवळ आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे सदनात बसून बोलण्याची परवानगी मागितली आहे. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जागेवर जास्त वेळ उभं राहून भाषण करता येणं शक्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ही परवानगी दिली जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतं.
नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून गैरहजर होते. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला होता. उद्धव ठाकरे आजारी असतील तर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरेंना देण्यास हरकत नाही असंही विरोधकांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर हळूहळू उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कार्यक्रमाला हजेरी लावणं सुरू केले.
अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमात दिसत आहेत. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हजर होते. परंतु त्याठिकाणीही त्यांची प्रकृती म्हणावी तेवढी ठीक नसल्याचं दिसून आलं. आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. त्यात विरोधकांनी विविध मुद्द्यावरून राज्य सरकारला चांगलेच कोडींत पकडलं आहे. मंत्री नवाब मलिकांच्या दाऊद कनेक्शनवरून भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात फडणवीसांनीही गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे सरकारची बाजू ठामपणे मांडण्यासाठी उद्धव ठाकरे सभागृहात विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत. परंतु प्रकृती कारणास्तव ते सदनात जागेवर बसूनच भाषण करतील.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….