नागपूरकरांना मिळणार हवेतून उडणारी बस ; नितीन गडकरींनी दिली माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- एकीकडे पुणेकरांना काल मेट्रोची भेट मिळाली आहे तर दुसरीकडे आता नागपूरकरांसाठीही एक हटके भेट मिळण्याची शक्यता आहे. नागपूरवासीयांना मिळणारी ही भेट काही साधीसुधी असणार नाहीये.
नागपुरकरांचा प्रवास अधिक सहज-सोपा करणारी ही भेट निश्चितच अनोखी अशी असणार आहे. नागपुरात आता जमिनीवर नाही तर हवेत धावणाऱ्या बसेस लोकांच्या सेवेमध्ये येणार आहे. याबाबतची माहिती दिली आहे ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी…! आपल्या रस्ते निर्मितीमुळे कौतुकास पात्र ठरणाऱ्या गडकरींनीच याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय की, नागपूरात हवेतून चालणारी केबल बस सुरू करणार आहोत, तसं सुतोवाच त्यांनी केलं आहे. दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेबाबत मागणी केली होती. त्यानंतर त्याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी उत्तरप्रदेशातील प्रयागराज पाठोपाठ नागपूरात देखील हवेतून धावणारी बस अर्थात केबल बस सुरू करणार असल्याचे जाहीर केलंय.
या बसेसच्या व्यवस्थेसाठी गडकरी यांनी आराखडा तयार करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 35 ते 40 सीटर ही केबल बस सध्या फिलिपिन्समध्ये चालवली जात असून त्याच धर्तीवर नागपूरात ही केबल बस सुरू केली जाईल, असे गडकरी म्हणाले आहेत. नागपूरातील ही केबल बस पारडीहून रिंगरोड मार्गे लंडन स्ट्रीटपर्यंत जाईल. तेथून हिंगणा टी पॉईंट, डिफेन्सवाडी येथून व्हेरायटी चौकापर्यंत पर्यंत जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..