मंत्री नवाब मलिक यांना आज जामीन मिळणार का..? मालिकांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी (ED) कोठडीत असलेले महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिका (Nawab Malik) यांना न्यायालयाने धक्का दिला आहे. ईडी कोठडीत असलेल्या मलिक यांचा जामिनासाठीचा अर्ज ३ मार्च रोजी फेटाळत विशेष न्यायालयाने त्यांच्या ई़डी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ केली होती. कुर्ला येथील तीन एकर जमिनीच्या व्यवहारात झालेल्या मनी लाँड्रिंगच्या आरोपात मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळं मलिकांची आज ईडी कोठडीची मुदत संपत आहे, त्यामुळं त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे, त्यामुळं मलिकांना बेल मिळणार कि जेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, याआधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे नवाब मलिक यांची चौकशी अपूर्ण राहिली असल्याचे कारण सांगत ईडीने विशेष न्यायालयाकडे मलिक यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाला केली. आरोपी सरदार शहवली खान याने दिलेल्या जबाबातील तपशीलाविषयी चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांनी काही माहिती दिली, त्याअनुषंगाने आम्हाला त्यांची अधिक चौकशी करायची आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आम्ही आणखी काहींचे जबाब नोंदवले आहेत, त्याअनुषंगानेही मलिक यांची अधिक चौकशी करायची आहे, असे ईडीतर्फे अनिल सिंग यांनी ३ मार्चला कोर्टाला सांगितली होती.
ईडीकडून आधी ८ दिवसांपैकी नवाब मलिक यांची चौकशी करण्यासाठी फक्त जवळपास चारच दिवस मिळाले. ईडीच्या पहिल्या रिमांड अर्जात आम्ही अनेक आर्थिक व्यवहार दाखवले होते, त्याविषयी अधिक चौकशी करायची आहे. हसीना पारकरचा पूर्वीचा जबाब, व्यवहारात ज्या मुनिरा प्लांबरची फसवणूक झाली तिचा जबाब, मिनिराला एक पैसाही मिळाला नाही, त्या जमिनीची मालकी आता मलिक यांच्याकडेच आहे, या सर्व पार्श्वभूमीवर सहा दिवसांच्या कोठडी वाढीची आवश्यकता आहे, असा युक्तीवाद सिंग यांनी लढवत मलिकांच्या कोठडीत वाढ केली होती. मलिकांच आज इडीची कोठडी संपत आहे, त्यामुळं त्यांना जामीन मिळणार का? मलिक अधिनेशनात दिसणार का? कि त्यांची कोठडी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..